Admin Login     

Member Bank Login

उद्देश

सोलापूर जिल्हा नागरी बँक्स सह. असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी बॅंकाच्या व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा, त्यांच्या कार्यात एकसूत्रता यावी, त्यांचे काम अधिकाधिक परिणामकारक व लोकाभिमुख आणि व्यावसायिक व्यवस्थापनास अनुलक्षून व्हावे म्हणून नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधीच्या परिषदा व बैठका बोलावून त्यांना मार्गदर्शन करणे, मागणीनुसार आर्थिक व्यव्हारासंबधी सल्ला देणे आणि विविध स्तरावर त्यांचे प्रश्न सोडवून या बँकांचा प्रवक्ता म्हणून काम करणे. महाराष्ट्र शासन, आर.बी.आय. व बँकादरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याकरीता प्रयत्न करणे.

सभासद बॅंकाच्या बँकिंग व्यवसायाचे संदर्भात येणाऱ्या अडचणी व प्रश्नांचे बाबतीत रिझर्व्ह बँक, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बँक्स फेडरेशन नवी दिल्ली, सहकारी खाते व अन्य संबंधित संस्थांकडे सभासद बँकांचे प्रतिनिधित्व करून सोडविण्याचे प्रयत्न करणे.

पुनर्वसनात असलेल्या बँकांना मागणीनुसार सल्ला देणे, मार्गदर्शन करणे व त्यांना त्यातून बाहेर येणेस मदत करणे.

सभासद बॅंकाच्या सभासदांना, संचालकांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अगर याबाबत योग्य ती सोय उपलब्ध करून देणे.

सभासद बॅंकाचे थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली सहकार खात्याचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेऊन बँकांचे थकभाकीदारा विरुद्ध वसुली दाखले देणेची कार्यवाही करणे, त्यासाठी स्वतंत्र वसुलीकक्ष चालविणे.

सभासद बॅंकाना त्यांच्या गरजेनुसार भेटी देऊन मार्गदर्शन करणे. रिझर्व्ह बँक, सहकार खाते, महाराष्ट्र राज्य नागरी बँक्स असोसिएशन यांचेकडून आलेले आदेश व सूचना या संबंधी सभासद बॅंकाना आवश्यक्तेनुसार माहिती पुरविणे.
आर्थिक बाजार व नवीन योजना अगर अस्तित्वात असलेल्या कर्जासंबंधीच्या निरनिराळ्या योजनांची माहिती व त्यासाठी मिळणाऱ्या सवलतीचा फायदा सभासद बॅंकाना देणेच प्रयत्न करणे.

सभासद बॅंकाकडून वार्षिक हिशोबाची पत्रके, अहवाल व सांख्यकीय माहिती मागवून एकत्रित करणे व प्रसिद्ध करणे.

बँकींग व्यवहाराला पोषक असे अद्ययावत ग्रंथालय सुरु करणे यासाठी आवश्यक ती पुस्तके खरेदी करणे.
नागरी सहकारी बँकिंगच्या विधायक कार्याचा प्रचार व प्रसार विविध माध्यमातून करणे. जरूर तर स्वताचे वृत्तपत्र/पाक्षिक/मासिक/ याद्वारे प्रबोधन करणे.
सभासद बॅंका व त्यांचे नोकर यांचे संबंध चांगले राहावेत म्हणून प्रयत्न करणे.

असोसिएशनच्या हिताच्या व उपयुक्ततेच्या दृष्टीने आवश्यक वास्तू भाड्याने घेणे, संपादन करणे, खरेदी करणे, जागा घेऊन बांधणें, तिची देखभाल करणे अथवा तिचे रुपांतर/बदल करणे.


 
असोसिएशनचे कार्यासाठी लागणारा निधी व वर्गणी गोळा करणे व त्याचा असोसिएशनचे उद्देश पूर्ततेसाठी विनियोग करणे.

सदस्य बँकांना सामूहिक, तांत्रिक व अन्य सेवा उपलब्ध करून देणे व त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे शुल्क आकारणे.

सदस्य बँका तसेच इतर वित्तिय संस्थांसाठी बीझनेस फैसिलेटर व बीझनेस करस्पाडेंट म्हणून काम करणे, त्याचप्रमाणे क्रेडीट इन्फरमेशन हुमन रिसोर्स व इतर क्षेत्रात सदर बँका व संस्थाना सेवा उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे शुल्क आकारणे.

सदस्य बँकासाठी व इतर वित्तिय संस्थांसाठी ए.टी.एम., डाटा सेंटर, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस व तत्सम, इतर सामुहिक, तांत्रिक व अन्य सेवा बँकिंगसंबंधी तसेच सेमिनार आयोजित करून तज्ञांचे मार्गदर्शन देणे.

सहकारी बँकिंगच्या विधायक कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपाय योजना करणे. जरूर तर स्वताचे वृत्तपत्र/पाक्षिक/मासिक/पुस्तक याद्वारे प्रकाशन करणे, प्रबोधन करणे.
नागरी सहकारी बँकांसाठी आवश्यकतेनुसार मॅन्युअल, मार्गदर्शिका तयार करणे.

मागणीनुसार सभासद बँकांना वेळोवेळी माहिती पुरवणे व बँकिंगविषयी मार्गदर्शन करणे, अडचणी उत्पन्न झाल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे व त्यासाठी आर्थिक व तांत्रिक माहिती असणाऱ्या तंत्रज्ञाची नेमणुका करणे.

Nviin नवीन नागरी बँक स्थापनेसाठी तसेच शाखा विस्तारासाठी नागरी सहकारी बँकांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, व आवश्यक ते सहकार्य करणे.
असोसिएशन सदस्य बँकांच्या मागणीनुसार सेवकांचे नियुक्ती, बढतीसाठी निवड करणे, यासाठी साहाय्य करणे.

जिल्हा स्तरावर नागरी सहकारी बँकांच्या वाढीसाठी नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करणे. व अमलात आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करणे व त्यासंबंधी बँकांना सल्ला मार्गदर्शन कार्यक्रम करणे.

सर्वसामान्य जनतेमध्ये सदस्य बँकांची प्रतिमा सुधारण्यासाठी योजना आखणे व त्यानुसार क्र्यावाही करणे.

आर्थिक व व्यवस्थापकीय दृष्ट्या चांगल्या बँकाना, बँकिंग क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना प्रोत्साहन/गौरव पर पुरस्कार / पारितोषिके देणे व सहकार चळवळीच्या विकासाच्या दृष्टीने जरुरीप्रमाणे कार्यक्रम करणे.